निधन वार्ता : विजय (आप्पा) बापूसो जगनाडे.

कोल्हापूर : कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ येथील विजय (आप्पा) बापूसो जगनाडे (वय 62 वर्षे) यांचे गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यामध्ये ते आप्पा म्हणूनही सर्वपरिचित होते. तसेच ते गेल्या 25 वर्षांपासून रेशन दुकान व्यावसायिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी मनमिळाऊ स्वभावामुळे मोठा ग्राहकवर्ग व मित्रपरिवार जमविला होता. त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारासह परिसरातील नागरिकांतून हळवळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी , पुतण्या, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

माती सावरणे विधी : रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता रुद्र भूमी (पंचगंगा नदी) येथे होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!