पुण्याचा कॅंडिडेट मास्टर अक्षय बोरगावकर “अजिंक्य”

– महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा

– इंद्रजीत उपविजेता केवल व अनिकेतची निवड

– राष्ट्रीय स्पर्धेसाठी 4 खेळाडूंची निवड

– दिल्ली येथे 23 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023 या होणार राष्ट्रीय स्पर्धा.

*कोल्हापूर : (“मानस न्युज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)*

न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहामध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनामहाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित महाराष्ट्र राज्य खुल्या निवड, गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या
अंतिम आठव्या फेरीनंतर अग्रमानांकित कॅंडिडेट मास्टर पुण्याचा अक्षय बोरगावकरने आठ पैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. त्याला रोख 10 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

उपविजेता व इतर विजेते खेळाडू असे…

तृतीय मानांकित औरंगाबादचा इंद्रजीतमहिंद्रकर साडेसहा गुण व (39) सरस टायब्रेक गुणाधारे स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. त्याला रोख 9 हजार रुपये देऊन गौरविले. अकरावा मानांकित पुण्याचा केवल निर्गुण याला साडेसहा गुण व (38.5) टायब्रेक गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रोख 8 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. सोळावा मानांकित सातारचा अनिकेत बापट व 21 वा मानांकित पुण्याचा अथर्व मडकर साडेसहा गुण व कमी टायब्रेक गुणामुळे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी घसरले. सहा गुण मिळवणारे गणेश ताजणे (नाशिक) रचित गुरुनानी (मुंबई) व मानस गायकवाड सोलापूर टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे सहावे,सातवे व आठवे क्रमांकाचे बक्षीस मिळविले. साडेपाच गुण मिळवणारे मिहीर सरवदे(40) पुणे व रियान शहा (39) मुंबई अनुक्रमे नववा व दहावा क्रमांक मिळवून बक्षीसास पात्र ठरले.

*राष्ट्रीय स्पर्धेसाठी 4 खेळाडूंची निवड*

*या स्पर्धेतून प्रथम आलेल्या पुढील चार खेळाडूंची निवड 59 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ निवड स्पर्धेसाठी करण्यात आली.*
*1) कॅंडिडेट मास्टर अक्षय बोरगावकर (पुणे)*
*2) इंद्रजीत महेंद्रकर (औरंगाबाद)*
*3) केवल निर्गुण (पुणे)*
*4) अनिकेत बापट (सातारा)*

*उत्तेजनार्थ बक्षिसे पुढीलप्रमाणे*

*दिव्यांग बुद्धिबळपटू*

ओंकार तळवळकर (पुणे) व संस्कृती मोरे (दहिवड,सातारा).

*सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

वरद पाटील ( बस्तवडे) व श्रेयस कुदळे (कोल्हापूर).

*नऊ र्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

रियार्थ पोद्दार (इचलकरंजी), चिराग रेड्डी (पुणे), विवान सोनी (इचलकरंजी), कश्यप खाकरीया (सांगली) व हित बलदवा( जयसिंगपूर).

*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

पूर्वन शहा (मुंबई), अभय भोसले (जांभळी), आदित्य चव्हाण (सांगली), अरिना मोदी (कोल्हापूर) व सिद्धार्थ चौगुले (कोल्हापूर).

*तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

कुशाग्र जैन (पुणे), वीरेश शरणार्थी (पुणे), जयवीर पाटील (मुंबई) अनिरुद्ध सतीश (ठाणे) व शशांक के (मुंबई).

*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

ऋषिकेश कबनूरकर (कोल्हापूर), साई शर्मा (नागपूर), शंतनू पाटील (कोल्हापूर), हदीन महात (सांगली) व अक्षय कुमार (मुंबई).

*उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू*

तृप्ती प्रभू (कोल्हापूर), ईश्वरी जगदाळे (सांगली), तन्वी बोराटे (मुंबई), महिमा शिर्के (कोल्हापूर) व शर्वरी कबनूरकर(कोल्हापूर).

*उत्कृष्ट ज्येष्ठ साठ वर्षावरील बुद्धिबळपटू*

बी एस नाईक (कोल्हापूर) आनंदराव कुलकर्णी (कोल्हापूर) व चंद्रशेखर खडके (औरंगाबाद).

*बक्षिस वितरण समारंभास यांची प्रमुख उपस्थिती*

स्पर्धेच्या बक्षिस वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखा परीक्षक मुकुंद भावे, बँक ऑफ महाराष्ट्र कोल्हापूर झोनचे वरीष्ठ प्रबंधक नितीन सर्वगोड व व्यवस्थापक अमित आनंद, सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष विवेक शुक्ल व न्यू एज्युकेशन सोसायटीचे व्हॉइस चेअरमन नितीन वाडीकर आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पुण्याचे नितीन शेणवी व भरत चौगुले स्पर्धा संचालक मनीष मारुलकर व धीरज वैद्य उपस्थित होते.

*स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम*

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संचालक मनीष मारुलकर यांना भरत चौगुले,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे, आरती मोदी, करण परीट,रोहित पोळ,अमित मोदी,प्रितम घोडके व राजेंद्र मकोटे यांनी परिश्रम केले.

*दरम्यान,* न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहामध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनामहाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित महाराष्ट्र राज्य खुल्या निवड, गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेची शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर 2022) रोजी सांगता झाली. या स्पर्धा बँक ऑफ महाराष्ट्रने पुरस्कृत केल्या होत्या.

*राष्ट्रीय स्पर्धा 23 डिसेंबरपासून*

*59 वी अखिल भारतीय राष्ट्रीय खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा दिल्ली येथे 23 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023 दरम्यान होणार आहेत.*

You may also like

error: Content is protected !!