– रविवारी राजभवनातील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
कोल्हापुरातील “स्टार्टअप” विजेत्या सोहेली पाटील आणि डॉक्टर स्नेहल माळी यांना नवकल्पनेसाठी राज्यस्तरीय महिला नवउद्योजिका पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते रविवारी (दि.16 ऑक्टोबर 2022) झालेल्या राजभवनातील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
*कोल्हापूरातुन सोहिली व डॉ. स्नेहल यांची निवड*
कोल्हापूर जिल्ह्यामधून निवड झालेल्या सोहेली पाटील यांनी “आहार किंवा डोस देताना अस्वस्थता आणि लहान मुलांसाठी एक स्मार्ट आरामदायी प्लॅटफॉर्म” तयार केला आहे. तर डॉ. स्नेहल माळी यांची राज्यस्तरावरून सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्काराकरिता निवड केली आहे. जिल्हास्तरावर सोहेली पाटील (आरोग्य) यांना प्रथम विकास बोडके (पूर व्यवस्थापन) यांना द्वितीय तर धनंजय वडेर (राणादा थंडाई) यांच्या नवकल्पनांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.
*21 पारितोषिकांचे वितरण*
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील जिल्हास्तरीय विजेत्यांमधून राज्यस्तरावर प्रत्येक क्षेत्रातील प्रथम व द्वितीय असे प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महिला अशी एकूण 21 पारितोषिके मुंबईत राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कॉन्सुलेट जनरल लॅकवॉल आदींची प्रमुख उपस्थिती होती.