– “जीवनगौरव पुरस्कार” विजेते व ज्येष्ठ शरीरसौष्ठव प्रशिक्षक बिभीषण पाटील यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा
– मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यांकडून “चांदीची गदा” देऊन गौरव
कोल्हापूर : (मानस न्यूज 9 : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
जीवनगौरव गुरूंचा.. शिष्यांनी
“चांदीची गदा” देऊन साधला “अमृत” योग..! निमित्त होते फुलेवाडीतील “अमृत मल्टीपर्पज हॉल”मध्ये रविवारी (दि. 16 ऑक्टोबर 2022 ) साजरा झालेल्या “जीवनगौरव पुरस्कार” विजेते व ज्येष्ठ शरीरसौष्ठव प्रशिक्षक बिभीषण पाटील यांच्या “अमृत महोत्सवी वाढदिवसाचे.”
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक प्रा. प्रशांत बिभीषण पाटील, श्रीशांत व अमर जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून बिभीषण पाटील यांच्या “जीवनप्रवास व शरीरसौष्ठव” या खेळातील उल्लेखनीय कामगिरी तसेच कार्याचा आढावा घेतला. गुरूंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या खेळाडूंनी कारकीर्द व सराव आदींसह जुन्या आठवणींना उजाळा दिला.
*75 दिव्यांनी औक्षण*
कार्यक्रमस्थळी उपस्थित शिष्य व मित्रपरिवाराने बिभीषण पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. तर पत्नी हेमलता, बहिण सत्यवती, कलावती, भारती आणि सुषमा यांनी पाटील यांचे 75 दिव्यांनी औक्षण केले.
*शिष्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव*
शिष्यांनी गुरु बिभीषण पाटील यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून अभिवादन केले. यावेळी मिस्टर वर्ड किताब पटकविलेले संग्राम चौगुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, ओलंपिया प्रो-कार्ड विजेता सुहास खामकर, गोकुळचे संचालक चेतन नरके, शाहू शिक्षण संस्थेचे सचिव विजय बोंद्रे, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, कोल्हापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ, कोजिमाशी संचालक व शिक्षक शितल विवेकानंद हिरेमठ, प्रा. सागर चरापले, आंतरराष्ट्रीय महिला वेटलिफ्टर वर्षा पत्की, स्नेहांकित वरुटे, के.जी. जाधव दया कावरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.