विध्यार्थ्यांनी दिला वाचन संस्कृतीचा संदेश

– वि.मं.व्हनाळी शाळेच्या चौथीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

– २२० वृत्तपत्रांचे वितरण

– माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर : (मानस न्युज 9 विशेष प्रतिनिधी)

वि.मं.व्हनाळी,ता.कागल या जि.प.शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्हनाळी गावातील २२० वाचकांना वृत्तपत्रांचे वितरण करून स्वावलंबी शिक्षणाचा जागर करताना ‘कमवा व शिका ‘योजनेचे महत्त्वही अधोरेखित केले. तसेच या उपक्रमाततून विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचा संदेश देण्याचे महान कार्य केले. निमित्त होते भारताचे मिसाईल मॅन,मा.राष्ट्रपती महान वैज्ञानिक, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती व वृत्तपत्र विक्रेता दिनाचे.

हा उपक्रम वर्गशिक्षक बाळकृष्ण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. याप्रसंगी सुरवातीला मा.राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन वृत्तपत्र विक्रेता जालंदर परीते यांचे हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना वर्गशिक्षक बाळकृष्ण चौगले यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांच्या जीवनकार्याचा आढावा घेवून त्यांचे विचार युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

*कु.गौरी जाधवने केले उत्स्फूर्त भाषण*

कु.गौरी जाधव हिने वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या ठळक बातम्यांचे वाचन केले. तसेच “मी ए.पी.जे.अब्दुल कलाम बोलतोय व वृत्तपत्र वाचन काळाची गरज” या विषयावर उत्स्फूर्तपणे भाषण केले.

*वृत्तपत्र विक्रेत्याचा विशेष सन्मान*

कोरोना काळासह महापूर सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अडचणीवर मात करत वत्तपत्र वाचकांना पोहोचवण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. याबद्दल वृत्तपत्र विक्रेता जालंदर परीते यांचा मुख्याध्यापक बबन चौगुले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

*उपक्रमासाठी यांनी घेतले परिश्रम*

जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम यशस्वी करण्यासाठी शा.व्य.समिती अध्यक्ष बाबासो आगळे, यशवंत मेथे , बाळासाहेब देशमुख, तुळशीदास माने, संदीप शितोळे, पुष्पा पाटील, साधना माने, धनश्री गुदले, विद्यार्थी, पालक आदींनी परिश्रम घेतले.

*वाचन संस्कृती बळकट करा : ग्रंथपाल यशवंत मेथे*

जय भवानी मोफत वाचनालयात थोर पुरुषांच्या प्रेरणादायी विचारांच्या १५०० पुस्तकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते झाले. ग्रंथपाल यशवंत मेथे यांनी प्रेरणादायी अवांतर वाचनाचे महत्व सांगताना वाचन संस्कृती बळकट करण्याचे आवाहन केले.

You may also like

error: Content is protected !!