*खुल्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून

– कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे भरत चौगुले यांची माहिती

– १८ ते २१ ऑक्टोबर २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत होणार स्पर्धा

– कोल्हापुरात प्रथमच खुल्या राज्य निवड बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : (मानस न्युज9 – क्रीडा प्रतिनिधी नंदकुमार तेली)

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने कोल्हापुरात प्रथमच १८ ते २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत खुल्या महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.,
अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे भरत चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला मनीष मारुलकर, धीरज वैद्य, आरती मोदी, अनिश गांधी आदी उपस्थित होते.

– आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार स्पर्धा

न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात या स्पर्धा रंगणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेरीमध्ये होणार आहेत.या स्पर्धेतील पहिल्या येणाऱ्या दहा क्रमांकांना एकूण रोख ५० हजार रुपये व चषक बक्षीस म्हणून ठेवले आहे. स्पर्धा विजेत्यालारोख दहा हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. उपविजेत्यास नऊ हजार रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकास आठ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाईल.

– नाव नोंदणी राज्य बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील चार निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना आठशे रुपये प्रवेश फी आहे. त्या व्यतिरिक्त इतरांना पंधराशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली नावे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकेतस्थळावर https://mcachess.in/Tournament_Registration/Registration/registration_form.php ऑनलाईन पद्धतीने प्रवेश फी व फॉर्म भरून नोंदवावीत.

– जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या गुणांकन स्पर्धा

या स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या गुणांकन स्पर्धा आहेत त्यामुळे भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेची ऑनलाईन खेळाडू नोंदणी फी २५० रुपये व फॉर्म भरून नोंदणीकृत होणे आवश्यक आहे.

अशी आहे पंचांची टीम…

या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून मनिष मारुलकर हे आहेत. मुख्य पंच म्हणून पुण्याचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा. नितीन शेणवी आणि उपमुख्य पंच म्हणून कोल्हापूरचे भरत चौगुले यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने केली आहे. त्यांना इचलकरंजीचे करण परीट, रोहित पोळ कोल्हापूरचे आरती मोदी व उत्कर्ष लोमटे हे सहाय्यक पंच म्हणून सहकार्य करतील.

पहिल्या चार खेळाडूंची निवड होणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी

या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेतून पहिल्या येणाऱ्या चार खेळाडूंची निवड 59 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात होणार आहे. 59 वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा दिल्ली येथे 22 डिसेंबर ते तीन जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!